संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी यांच्या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ
रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य करणा-या संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ने एक नवीन उपक्रम हाती घेतला असून त्याची सुरुवात ही करण्यात आली. रत्नागिरी रेल्वे स्टेशन जवळ एक मनोरुग्ण असल्याची खबर पोलीसांकडून संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ला आला, संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर यांनी त्वरीत संस्थेचे सल्लागार सचिन शिंदे यांना ही गोष्ट सांगितली, सचिन शिंदे यांनी त्वरित हालचाल करुन त्या मनोरुग्णाला रेल्वे स्टेशन रत्नागिरी येथून ताब्यात घेतले, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सदर रुग्णाची शारीरिक तपासणी करुन पोलीसांच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मनोरुग्णालयात त्याला घेवून गेले आणि रितसर तेथे दाखल केले.सचिन शिंदे यांनी यापूर्वी ही साधारणपणे 450 ते 500 मनोरुग्णांना ताब्यात घेवून त्यांचेवर उपचार करुन बरे केले आहेत.संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या माध्यमातून सचिन शिंदे यांनी केलेल्या कामाबद्दल अध्यक्ष शकील गवाणकर यांनी त्यांना धन्यवाद दिले आहे.
