महाराजांचा व स्वतःचा फोटो जोडून बनावटीकरण ; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी – तालुक्यातील नाणीज येथील श्री क्षेत्र नाणीजधाम येथील टेक्नीकल टिम इंस्टाग्राम सोशल मिडीयावर संस्थेच्या सीईआ म्हणून काम करत असताना संशयिताने जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या फोटो सोबत स्वतःचा फोटो एकत्रित करुन बनावटीकरण केले. या प्रकरणी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युजरनेम ऑफिशियल अनिल जाधव असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २२ फेब्रुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सीईओ जेएनएमएस नाणीजधाम रत्नागिरीचे सुनिल रामलोचनसिंग ठाकूर (वय ५९) हे नाणीजधाम चे टेकनिकल टिम काम पहात असताना इंस्टाग्राम, यु ट्यूब, फेसबुक सोशल मिडीया अकाऊंट महाराजांचे कार्यक्रमाबाबत अपडेट करत असताना २२ फेब्रूवारीला दुपारी युजरनेम संशयित अनिल जाधव याने नरेंद्र महाराज यांचा फोटो सोबत स्वतःचा पोटो एकत्रित जोडून बनावटीकरण करुन सोशल मिडियावर शेअर करुन त्यावर वादग्रस्त मजकूर लिहून महाराजांच्या लौकीकास बाधा निर्माण यांची जाणीव असतानाही लोकांची दिशाभुल केली. या प्रकरणी सुनिल रामलोचनसिंग ठाकूर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.