वाहतुकीस अडथळा, दोघांवर कारवाई
चिपळूण :
शहरातील बहादूरशेखनाका, चिंचनाका येथे चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दोघांवर येथील पोलिसांनी कारवाई केली आहे. नरेश रामचंद्र गुहागरकर (३०, बोरज शेवरवाडी खेड), लियाकत सालेखान खान (४८, वेडेळे) अशी त्यांची नावे आहेत. यातील गुहागरकर याने बुधवारी दुपारी १.४५ वाजता बहादूरशेखनाका येथे आपल्या ताब्यातील मॅक्झिमा रिक्षा वाहतुकीस अडथळा व पादचाऱ्यांना धोका होईल, अशी उभी करून ठेवली होती. पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन देशमुख यांच्या फिर्यादीवरुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. खान याने बुधवारी सकाळी ११.५० वाजता आपल्या ताब्यातील टाटा मॅजिक गाडी शहरातील चिंचनाका येथे उभी करून ठेवली होती. यामुळेही वाहतुकीस अडथळा होत होता. याबाबत पोलीस नाईक रोशन पवार यांनी तक्रार दिली.