तेरेवायंगणी येथे तरुणाची आत्महत्या
दापोली : तालुक्यातील तेरेवायंगणी बौद्धवाडी येथे सुमित मधुकर मोहिते या २९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते २ मार्च दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित मोहिते हा चंद्रनगर येथे कामाला जातो सांगून घरातून निघून गेला होता. तो घरी आला नाही म्हणून आजूबाजूच्या परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. त्याचा शोध घेत असताना तेरे वायंगणी येथील जंगलमय भागात पाखर याठिकाणी जंगलातील केवस जातीच्या जंगली झाडाला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळून आला. दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.