सार्वजनिक ठिकाणी मद्यपान ; तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी – शहरातील साळवी स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल लालमन विश्वकर्मा (वय ३४, रा. साईभूमीनगर, शिरगाव, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव आहे.
ही घटना २८ फेंब्रुवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास साळवी स्टॉप येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.