शीळ धरणानजिक दुचाकीची कारला धडक
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या शिळ धरणाच्या पुढे चढावात बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणाऱ्या कारला धडक देत अपघात केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना 31 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 11.15 वा.सुमारास घडली होती.
वेदांत उदय वाजे (25,रा.टिआरपी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत यांनी तकार दिली आहे. त्यानुसार, 31 डिसेंबर रोजी कार चालक मकसूत रमजान शिरगावकर(54,रा.मिल्लतनगर मजगाव रोड,रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील रेनॉल्ट ट्रीबर कार (एमएच-08-एएक्स-6083) घेउन रत्नागिरी ते जाकादेवी असे मजगाव रस्त्याने जात होते. त्याच सुमारास वेदांत वाजे हा आपल्या ताब्यातील बुलेट हंटर दुचाकी (एमएच-08-बी.बी-1114) घेउन समोरुन येत होता. ही दोन्ही वाहने शिर धरणाच्या पुढे चढावात आली असता वेदांतचा दुचाकीवरील ताबा सूटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणाऱ्या कारला धडक देत अपघात केला होता. यात वेदांतला दुखापत होउन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी बुधवार 25 फेब्रुवारी 2026 रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर येथे कार चालकाची पादचाऱ्याला धडक
रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेदरकारपणे कार चालवून वुध्द पादचारी जब्बार ईस्माईल बंदरी (70,रा.चांदेराई,रत्नागिरी) यांना धडक देत अपघात केल्याप्रकरणी कार चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.40 वा.सुमारास शिवाजीनगर येथे घडली.
डॉ.भाग्यश्री मनोहर हेडाउ (35,रा.साई समर्थ अपार्टमेंट कोर्ले रोड,लांजा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल शरद कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भाग्यश्री हेडाड ही आपल्या ताब्यातील कार ऑल्टो कार (एमएच-08-एएक्स-8831) घेउन मारुती मंदिर ते लांजा अशी जात होती. ती शिवाजीनगर येथील प्रविण सुपर मार्केटच्या समोर आली असता तिने पादचारी जब्बार बंदरी यांना धडक देत अपघात केला. यात त्यांना दुखापत होउन गाडीचेही नुकसान झाले होते.