लोकशाही दिन 4 मार्च रोजी
रत्नागिरी, :- जिल्हास्तरावर माहे मार्च 2026 चा लोकशाही दिन बुधवार 4 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात होणार आहे. दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. जिल्हाधिकारी यांच्या 18 फेब्रुवारी 2026 रोजीच्या आदेशान्वये सोमवार 2 मार्च 2026 रोजी जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे तसेच 3 मार्च 2026 रोजी धुलिवंदन असल्याने शासकीय सुट्टी आहे. यामुळे यावेळा लोकशाही दिन 4 मार्च 2026 रोजी होणार आहे, असे उपजिल्हाधिकारी सा.प्र. विश्वजीत गाताडे यांनी कळविले आहे.
लोकशाही दिनाकरीता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरीकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात.