महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे समाजसेवा प्रशिक्षण पूर्ण
रत्नागिरी: शहरातील प्रसिद्ध असलेले गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांनी समुदाय सहभाग कार्यक्रम अभ्यासक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांना संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे वतीने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या संस्थेचे असलेले रुग्ण मदत केंद्र येथून हे प्रशिक्षण देण्यात आले, यापूर्वी ही तीन बॅचेस मधील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले होते, आतापर्यंत चार बॅच मधून सुमारे 75 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले,या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा कृष्णकांत खांडेकर,हिंदी विभाग प्रमुख प्रा शाहू मधाळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी चे समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव,सौ.नेहा महाडिक,जागृती देशमुख, पत्रकार, एनजीओ रत्नागिरी जिल्हा समिती अध्यक्ष जमीर खलफे, संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे अध्यक्ष शकील गवाणकर उपस्थित होते.यावेळी शकील गवाणकर यांनी प्रशिक्षणार्थी यांना संबोधित केले,रेशम जाधव यांनी समाजसेवा बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली,प्रा कृष्णकांत खांडेकर यांनी एनजीओ करीत असलेल्या सहकार्य बद्दल गौरवोद्गार काढले, तसेच प्रा शाहू मधाळे यांनी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी च्या कार्याबद्दल कौतुक करून आभार मानले.16 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी अखेर झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात 28 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थ्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
