रत्नागिरी शहरात सोमवारी पाणीपुरवठा बंद
रत्नागिरी: शहरात सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तातडीची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून, भविष्यातील संभाव्य तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी ‘प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स’ मोहिम राबवली जात आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाने शनिवारी अधिकृत माहिती दिली.
या कामामुळे सोमवारी दिवसभर नळाला पाणी येणार नाही. तसेच मंगळवारी सकाळी पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होताना पाण्याचा दाब कमी राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रविवार संध्याकाळपर्यंत आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.