चंद्रनगरमधील वृद्धेचा आकस्मिक मृत्यू
दापोली : तालुक्यातील चंद्रनगर येथील लक्ष्मी हरिश्चंद्र येद्रे (८५) यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी येद्रे या सुमारे ३ महिन्यापासून अर्धांगवायूने आजारी होत्या. त्यांच्यावर घरीच उपचार चालू होते. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दुपारी १२ वाचण्याच्या सुमारास दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.