मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात
रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक १५ फेब्रुवारी, २०२६ रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
संत सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला.ते बंजारा समाजातील लोकांचे आराध्यदैवत आहेत. त्यांनी बंजारा समाजामध्ये असलेल्या प्रत्येकाला जगण्याचा मार्ग दाखविला. जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा, कोणालाही किंवा कोणत्याही प्रकारात भेदभाव करू नका, सन्मानाने आयुष्य जगा, पाण्याचे रक्षण करा, माणुसकीवर प्रेम करा अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर डॉ. चौधरी यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.
