जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत एसआरके तायक्वांदो क्लबची दमदार कामगिरी
क्योरुगी प्रकारात पटकावली तृतीय क्रमांकाची ट्रॉफी
रत्नागिरी येथे दि. ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या
१९ व्या जिल्हास्तरीय ओपन तायक्वांदो स्पर्धेत एस.आर.के. तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंनी 22 सुवर्ण 10 रौप्य 7 कांस्य पदक पटकावून क्योरुगी प्रकारात तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली.
श्रीयांश हातिसकर,श्रेया लिंगायत प्रांजल लांजेकर,स्पृहा सावंत श्रेयसी हातिसकर,मृण्मयी वायंगणकर,मृण्मयी वायंगणकर (ज्युनिअर) स्वरा साखळकर,स्वरा साखळकर (ज्युनिअर) सार्थक चव्हाण,सार्थक चव्हाण (सिनियर) वेदांत चव्हाण,सुजल सोलंकी, अमेय सावंत,श्रुती चव्हाण,सान्वी मयेकर,सान्वी मयेकर (सिनियर) दिया रणसे,गार्गी घडशी श्लोक पाटील,चैतन्य धुपकर,मानस शिवगण या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले.
आरवी नार्वेकर,रवी वारंग,निर्मित सावंत,अर्ध्य बने,अर्जुन पवार स्वर्णिका रसाळ,पार्थ गवाडे,देवण सुपाळ समर्थ बने,प्रश्वी लकेश्री तुळजा हर्षे,वेदिका भोसले,ओजस भोसले,राज गोरे यांनी रौप्यपदक जिंकले. स्वरा साखळकर,मृदुला पाटील पार्थ गुरव,तीर्था लिंगायत,चैतन्य कडू,विधान कांबळे मृण्मयी वायंगणकर कांस्यपदक जिंकले.
या स्पर्धेत खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरी केल्या पदल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्हा सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष विरेश मयेकर सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हातिसकर तसेच समस्त पालकवर्ग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी क्लबचे राष्ट्रीय पंच साहिल आंबेरकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.
संघ प्रशिक्षक म्हणून खेळाडूंना वेदांत चव्हाण, सुजल सोलंकी, अमेय सावंत, निखिल पवार, पार्थ गावडे, देवण सुपल, श्रुती चव्हाण, समर्थ बने यांनी काम पाहिले वरील सर्व खेळाडूंना तायक्वांडो प्रशिक्षक शाहरुख शेख व मिलिंद भागवत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे .