आजाराला कंटाळून वृध्दाची आत्महत्या
मोरवणे-दळवटणे सीमेवर गळफास
चिपळूण: चिपळूण तालुक्यातील मोरवणे खालचीवाडी येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीने असाध्य आजाराला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोरवणे आणि दळवटणे गावाच्या सीमेवर असलेल्या बंदरनी परिसरात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र रघुनाथ शिंदे (वय ५६, रा. मोरवणे खालचीवाडी, ता. चिपळूण) हे गेल्या अनेक दिवसांपासून ‘सोरायसिस’ या त्वचेच्या आजाराने ग्रस्त होते. या आजारामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले.
रविंद्र शिंदे यांनी मोरवणे व दळवटणे गावाच्या सीमेवरील बंदरनी नावाच्या ठिकाणी एका आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांचे शेजारी धर्मेंद्र शांताराम शिंदे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.