विनापरवाना हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई
रत्नागिरी ः निवे-बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथे पोलिसांनी विनापरवाना हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाईत ६१० रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन राजाराम हप्ते (वय ४३, रा. निवे बुद्रुक, गुरववाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार श्रीकांत जाधव यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.