किरकोळ कारणातून काठीने मारहाणभांडण सोडवणाऱ्यांनाही धक्काबुक्की
चिपळूण : तालुक्यातील बामणोली येथे किरकोळ कारणावरून एकाने दुसऱ्यावर काठीने मारहाण केल्याची घटना ५ तारखेला रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या चौघांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी तांबे (रा. बामणोली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत प्रवीण केशव पाचकुडे (वय ४२, रा. बामणोली) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण पाचकुडे हे त्यांच्या घराबाहेर कुत्र्यांना खायला घालत असताना समोरील रस्त्याच्या पलीकडे उभा असलेल्या रवी तांबे याने ‘तू माझे नाव कसे घेतलेस?’ असे म्हणत अचानक काठीने मारहाण केली.
दरम्यान, भांडण वाढू नये म्हणून मनोज पांडुरंग पाचकुडे, प्राजक्ता प्रवीण पाचकुडे, रेणुका मनोज पाचकुडे आणि कांचन कृष्णा कोटकर हे चौघे मध्यस्थी करण्यासाठी आले असता आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की केली. या घटनेप्रकरणी प्रवीण पाचकुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलिसांनी रवी तांबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.