रत्नागिरी साळवी स्टॉप येथे दोन दुचाकी जळून खाक
- रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेजारी उभी असलेली दुसरी दुचाकीही पेटली. परिणामी दोन्ही दुचाकी आगीत जळून खाक झाल्या. ही घटना आज सकाळी घडली.
या आगीचा झटका इतका तीव्र होता की जवळच उभी असलेली आणखी एक दुचाकीही पेटली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत घटनास्थळी दाखल होत आग नियंत्रणात आणली, त्यामुळे तिसऱ्या दुचाकीचे आंशिक नुकसान झाले.
अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.