जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर, लांजा, गुहागर, मंडणगड, दापोली, संगमेश्वर या नऊ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका-2026 करिता शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित निवडणूक क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मंगळवार 3 फेब्रुवारी 2026 रोजीच्या अधिसूचनेद्वारे रत्नागिरी जिल्हयातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर, लांजा, गुहागर, मंडणगड, दापोली, संगमेश्वर या नऊ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका-2026 करिता शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित निवडणूक क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुदृट्टी उक्तरोक्त नमूद करण्यात आलेल्या मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच उपरोक्त नमूद जिल्हा परिषद व पंचायत समित्या क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये,सार्वजनिक उपक्रम, बँका इ.ना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.