सांडेलावगण येथील अपंग तरुणाची आत्महत्या.
रत्नागिरी ः तालुक्यातील सांडेलावगड-वाकणवाडी येथील एका पायाने अपंग तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली. संतोष यशवंत पवार (वय ३६, रा. सांडेलावगण, वाकणवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष यांचा २०२३ मध्ये अपघातात पाय गेला होता. एका पायाने अपंग झाले होते. ते दारुच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. नेहमी दारुच्या नशेत असत रविवारी त्यांचा भाऊ राकेश पवार शेजारी असलेल्या देवघरातील लाईट लावण्यासाठी गेले असता त्यांना संतोष हा खोलीमध्ये छताच्या वाशाला दोरीने गळफास घेतल्या स्थितीत दिसून आला. तात्काळ त्याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.