वावघर–गुरववाडी येथे प्रौढाचा मृत्यू
दापोली
तालुक्यातील वावघर–गुरववाडी येथे राहणाऱ्या उदय रामचंद्र राऊत (वय ५५) यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ६.२५ वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उदय राऊत हे आपल्या राहत्या घरी झोपले असताना त्यांना अचानक तीव्र खोकला सुरू झाला. यामुळे त्यांचा श्वास कोंडला आणि ते बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची दापोली पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी दापोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.