पादचारी वृद्धाला धडक देणाऱ्या स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ एसटी स्टॉप (ता. संगमेश्वर) रस्त्यावर रस्ता क्रास करताना दुचाकीने वृद्धाला ठोकर दिली. या अपघातात ते जखमी झाले. संगमेश्वर पोलिस ठाण्यात संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश शंकर रेवाळे (वय २६, रा. आझाद नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माहिम ईस्ट-मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता.१) दुपारी दोनच्या सुमारास तुरळ एसटी स्टॉप रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी एकनाथ रंगा बेटकर (वय ५६, रा. शेनवडे बेटकरवाडी ता. संगमेश्वर) यांच्या गावातील जखमी तानाजी गोपाळ बेटकर (वय ७६, रा. शेनवडे बेटकरवाडी, संगमेश्वर) हे एसटी बसमधून उतरुन पायी मुंबई गोवा महामार्गावरिल रस्ता क्रॅास करुन जात असताना संशयित संदेश रेवाळे हा दुचाकी (क्र। एमएच-०१ सीजे ४५८१) याने तानाजी बेटकर यांना धडक दिली. या अपघातात ते जखमी झाले. या प्रकरणी एकनाथ बेटकर यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.