सावर्डे येथे उद्या अजितदादा पवार यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेचे आयोजन
चिपळूण : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जनमानसातील कणखर नेतृत्व लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेता यावे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करता यावी, या उद्देशाने राज्यभरात त्यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी हा अस्थिकलश सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी उपलब्ध होणार आहे.
🔹दर्शनाचा तपशील खालीलप्रमाणे
स्थळ: आमदार मा. श्री. शेखर निकम यांचे जनसंपर्क कार्यालय,सावर्डे.
वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत.
प्रमुख उपस्थिती: राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेते.
अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या कामाच्या धडाक्याने आणि स्पष्टवक्तेपणाने त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन त्यांना मानवंदना देण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येण्याची शक्यता आहे.
आदरणीय अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सर्वपक्षीय हितचिंतकांनी, नागरिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी १०:०० वाजता सावर्डे येथे उपस्थित राहून आपल्या लोकनेत्याला श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन बाबाजीराव जाधव (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रत्नागिरी) यांनी केले आहे.