उक्षी येथे विनापरवाना दारु विक्रीवर पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः तालुक्यातील उक्षी-बनाचीवाडी येथे विनापरवाना गावठी हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ९७० रुपयांची ९ लिटर दारु जप्त केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश शांताराम शिगवण (वय ३५, रा. उक्षी-बनाची वाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २९) सायंकाळी पावणेसहा च्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाई संशयिताकडे गावठडी हातभट्टीची विनपरवाना ९७० रुपयांची ९ लिटर दारु सापडली. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार सानिया कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.