जि. प. प्राथमिक शाळा जांभारी कुणबीवाडी येथे प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा
रत्नागिरी : जांभारी कुणबीवाडी (ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी) येथील जि. प. प्राथमिक शाळेत सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री. मोहन प्रकाश घोंगडे यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षण तज्ञ व ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले व सर्वांनी ‘ साक्षरता शपथ ‘ घेतली.
यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित ‘ संगीत कवायत ‘ सादर केली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी “Say No To Plastic” या गीतावर आधारित ‘ नृत्य व पथनाट्याचा संयुक्त परफॉर्मन्स ‘ सादर करून प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी प्रभावी जनजागृती केली.
यानंतर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा, प्लास्टिकविरोधी घोषणा, तसेच मतदान जनजागृतीविषयक घोषणा देत उत्साहात सहभाग घेतला. या फेरीस शिक्षक, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रभात फेरीनंतर शाळेमध्ये सर्व उपस्थितांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक श्री. मोहन प्रकाश घोंगडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहकारी शिक्षक श्री. अतुल मोहन सानप यांनी केले.