प्रशांतनगर येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी पळविली.
रत्नागिरी
शहरानजीकच्या प्रशांनगर-विमानतळ शेजारी रहात्या घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २७) रात्री दहा ते सव्वा अकराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेखर प्रकाश भोबल (वय ३३ रा. प्रशांतनगर प्रकाश रेवाळे यांच्याकडे भाड्याने, रत्नागिरी) यांनी दुचाकी (क्र. एमएच-०८ एटी २०९३) ही घरी पार्क करुन ठेवलेली असताना चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी शेखर भोबल यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.