कारवांचीवाडी येथे मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः कारवांचीवाडी ते पोमेंडी जाणाऱ्या रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समिर विजय चाळके (वय ३८ रा. पोमंडी बुद्रुक शिंदेवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २५) सायंकाळी साडेसहाच्या सुमराास पोमेंडी जाणाऱ्या रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडला. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सं