दापोलीत ब्रेझा- ट्रॅव्हलरची समोरासमोर धडक
ट्रॅव्हलर चालकावर गुन्हा दाखल
दापोली:
दापोली तालुक्यातील आसूद येथे ‘न्यू वेलकम रेसिडेन्सी’ हॉटेलसमोर दोन पर्यटकांच्या वाहनांचा भीषण अपघात झाला. रविवारी (दि. २५ जानेवारी) सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या ट्रॅव्हलर चालकावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील पिंपरी-चिंचवड (रावेत) येथील रहिवासी मंगेश सुरेश दाते (वय ३५) हे आपल्या ताब्यातील ब्रेझा कार (MH-14 MQ-7233) घेऊन मुरुडकडून दापोलीच्या दिशेने येत होते. त्याच वेळी समोरून, म्हणजेच दापोलीकडून मुरुड बीचकडे जाणारा टॅम्पो ट्रॅव्हलर (MH-12 VF-9330) भरधाव वेगात आला.
ट्रॅव्हलरचा चालक यशपालसिंग सुनील चव्हाण (वय २९, रा. वारजे माळवाडी, पुणे; मूळ रा. करमाळा, सोलापूर) याने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता आपली गाडी अत्यंत वेगाने आणि धोकादायक रित्या चालवली. यामुळे ट्रॅव्हलरने समोरून येणाऱ्या ब्रेझा कारच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही गाड्यांचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर मंगेश दाते यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी आरोपी ट्रॅव्हलर चालक यशपालसिंग चव्हाण याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.दापोलीत ब्रेझा- ट्रॅव्हलरची समोरासमोर धडक
ट्रॅव्हलर चालकावर गुन्हा दाखल
दापोली:
दापोली तालुक्यातील आसूद येथे ‘न्यू वेलकम रेसिडेन्सी’ हॉटेलसमोर दोन पर्यटकांच्या वाहनांचा भीषण अपघात झाला. रविवारी (दि. २५ जानेवारी) सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या ट्रॅव्हलर चालकावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील पिंपरी-चिंचवड (रावेत) येथील रहिवासी मंगेश सुरेश दाते (वय ३५) हे आपल्या ताब्यातील ब्रेझा कार (MH-14 MQ-7233) घेऊन मुरुडकडून दापोलीच्या दिशेने येत होते. त्याच वेळी समोरून, म्हणजेच दापोलीकडून मुरुड बीचकडे जाणारा टॅम्पो ट्रॅव्हलर (MH-12 VF-9330) भरधाव वेगात आला.
ट्रॅव्हलरचा चालक यशपालसिंग सुनील चव्हाण (वय २९, रा. वारजे माळवाडी, पुणे; मूळ रा. करमाळा, सोलापूर) याने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता आपली गाडी अत्यंत वेगाने आणि धोकादायक रित्या चालवली. यामुळे ट्रॅव्हलरने समोरून येणाऱ्या ब्रेझा कारच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही गाड्यांचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर मंगेश दाते यांनी दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी आरोपी ट्रॅव्हलर चालक यशपालसिंग चव्हाण याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.