राज्यस्थान येथील वृद्ध कामगाराचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः ईगल कंपनीमार्फेत रस्त्यावर पेंटीग करण्यासाठी आलेल्या राज्यस्थान येथील वृद्धा अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. प्रताप मवाशी सिंग (वय ६०, रा. महचौली ता. पिंपला जि. भरतपूर, राज्य राज्यस्थान) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २४) दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय पाली येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रताप सिंग हे ईगल कंपनीमार्फत रस्त्यावर पेंटीग काम करण्यासाठी आले होते. शनिवारी त्यांना अस्वस्थ वाटून छातीत दुखू लागल्याने तात्काळ त्यांना उपचारासाठी पाली येथील रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.