राजापूर पत्रकार संघाच्या वतीने स्विकृत नगरसेवक महेश शिवलकर यांचा सत्कार
राजापूर: राजापुरातील ज्येष्ठ पत्रकार व राजापूर पत्रकार संघाचे सल्लागार महेश शिवलकर यांची राजापूर नगर परिषदेच्या स्विकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल राजापूर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा गुरूवारी सत्कार करण्यात आला.
पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन शिवलकर यांचा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महेश शिवलकर हे गेली ३५ वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातुन त्यांनी राजापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे. शहरातील पुररेषा, पाणीप्रश्न, रस्ते, स्वच्छता यांसह गाळउपसा प्रश्नांसह अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे.
त्यांची राजापूर नगर परिषदेच्या स्विकृत नगरसेवकपदी निवड झाल्याने पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी पत्रकार संघाचे सचिव राजेंद्र बाईत, सहसचिव प्रकाश नाचणेकर, सदस्य विनोद पवार, भास्कर खडपे, संतोष मोंडे, संतोष शिंदे, प्रकाश वळंजू आदी उपस्थित होते.