उधमनगर पडवेकर कॉलनीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा अलिमियां काझी यांची बिनविरोध निवड
रत्नागिरी: शहरातील उधमनगर पडवेकर कॉलनी येथील ‘जमातुल मुस्लिमिन’ या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेत अलिमियां काझी यांची सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या उधमनगर पडवेकर कॉलनीची वार्षिक सर्वसाधारण सभा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. सभेची सुरुवात मौलाना फईम मापारी यांच्या ‘तिलावते कुरान’ने करण्यात आली. मावळते सेक्रेटरी अजीज नाकाडे यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले.
अध्यक्षीय भाषणात अलिमियां काझी यांनी मागील वर्षभरात संस्थेमार्फत करण्यात आलेल्या कार्याचा आणि उपक्रमांचा आढावा सादर केला. संस्थेची उद्दिष्टे आणि पुढील वाटचालीवर त्यांनी प्रकाश टाकला.
या सभेत अध्यक्षपदासोबतच इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, कार्यक्षमतेच्या जोरावर काही जुन्या चेहऱ्यांवर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला असून काही नवीन सदस्यांना संधी देण्यात आली आहे.
निवड झालेले प्रमुख पदाधिकारी:
- अध्यक्ष: अलिमियां काझी (सलग चौथ्यांदा)
- उपाध्यक्ष: सर्फराज पडवेकर आणि इम्तियाज मापारी (सलग दुसऱ्यांदा)
- खजिनदार: गुलरेज शेकासन (सलग दुसऱ्यांदा)
- सेक्रेटरी: मुद्दसर माद्रे (नवी निवड)
- सह सेक्रेटरी: फिरोज मुजावर (नवी निवड)
कार्यकारणी सभासद:
सज्जाद लांबे, सिकंदर खान, आलीम काझी, जुबेर मनेर, सईद मोंगल, अजीज पागरकर आणि फिरोज खान यांची कार्यकारणी सभासद म्हणून निवड करण्यात आली आहे.
अलिमियां काझी यांची बिनविरोध निवड जाहीर होताच नवनिर्वाचित पदाधिकारी आणि ज्येष्ठ सदस्य दिलावर नेवरेकर, मावळते सेक्रेटरी अजिज नाकाडे आदींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी हे नवे मंडळ एकजुटीने काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.