वांद्री येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः वांद्री (ता. संगमेश्वर) येथील झाडीझुडपाच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ९६० रुपयांची ९ लिटर दारु पोलिसांनी जप्त केली. संगमेश्वर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. शशिकांत अनंत जाव (वय ५२, रा. उक्षी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २१) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास वांदई बाजारपेठकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला आंब्याच्या झाडाखाली झाडीझुडपात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाई संशयिताकडे विनापरवाना गावठी हातभट्टीची ९६० रुपयांची ९ लिटर दारु सापडली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल संकेत आटोळे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.