कोंडगाव येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः कोंडगाव मच्छीमार्केट-देवरुख येथे विनापरवाना गावठी हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई ६३५ रुपयांची सहा लिटर दारु जप्त केली. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सागर चंद्रकांत शिंदे (वय ३८, रा. साखरपा, पत्कीवाडी ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २०) दुपारी पावणे एकच्या सुमारास कोंडगाव मच्छीमार्केट मधील चिकन दुकानाच्या बंद गाळ्याचे मागील बाजूस आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे ६३५ रुपयांची सहा लिटर विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु सापडली. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल रेश्मा चव्हाण यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.