पोमेंडी येथे पाईपलाईन फुटल्यामुळे मिऱ्या शिरगावचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद
रत्नागिरी
हरचिरी धरणातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पोमेंडी येथे फुटल्यामुळे मिऱ्या शिरगाव व अन्य गावांना होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे.
हरचेरी धरणातून येणारी पाईपलाईन कॉमेडी येथे फुटल्यामुळे तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. डोंगर उत्तरात असल्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीला वेळ लागणार आहे. त्यामुळे या जलवाहिनीवर अवलंबून असणारे शिरगाव मिऱ्या व अन्य गावांचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे