विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी ः दिवटेवाडी (ता. राजापूर) येथील प्रौढाला चक्कर येऊन बेशुद्ध पडला. तात्काळ त्यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. अजित वसंत शिंदे (वय ४५, दिवटेवाडी, ता. राजापूर) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १८) सकाळी पावणे सहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित शिंदे यांना चक्कर येऊन बेशुद्ध पडले. त्यांचा भाऊ संजय शिंदे यांनी त्यांना उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी त्यांनी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले असता त्यांना उलटी झाली त्याला उग्र वास आला म्हणून संजय शिंदे यांनी घरी कळविले असता त्यांच्या पत्नीला विषारी औषधाची बाटली सापडली. रिकामी बाटली डॉक्टरांनी दाखविली असता त्यावरुन डॉक्टरांनी उपचार सुरु केले. उपचार सुरु असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. राजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.