‘श्रीमान’ कथासंग्रहाला माहेर साहित्यरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर
रत्नागिरी : प्रतिनिधी
माहेर संस्थेचा माहेर राज्यस्तरीय माहेर साहित्यरत्न पुरस्कार दुर्गेश आखाडे यांच्या ‘श्रीमान’ कथासंग्रहाला जाहिर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण दि.५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा.३० मिनिटांनी हातखंबा येथील माहेर संस्थेत होणार आहे.हा पुरस्कार माहेर संस्थेच्या संस्थापक संचालिका लुसी कुरियन यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
दुर्गेश आखाडे यांच्या श्रीमान कथासंग्रह हा २०२४ मध्ये प्रकाशित झाला होता.कथासंग्रहात दहा कथांचा समावेश आहे.