मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
पावस ः पावस येथील गौतमी नदीच्या किनारी व कुर्धे-स्वरुपनगर येथील अंतर्गत सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र पांडुरंग पावसकर (वय ४५, रा. पावस बकालवाडी, रत्नागिरी) व मंदार कृष्णा शिवगण (वय ३६, रा. गावखडी, ब्राह्मणवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहे. ही घटना शनिवारी (ता. १७) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास गौतमी नदीच्या किनारी व कुर्धे-स्वरुपनगर येथील अंतर्गत रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित पावसकर व शिवगण हे सार्वजनिक ठिकाण मद्यपान करत असताना सापडले. या प्रकरणी पोलिस नाईक प्रशांत लोहळकर व पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश कुबडे यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.