महिलेचा आकस्मिक मृत्यू
पावस, : सांगली येथून लांजा-सापुचेतळे येथे भाजीविक्री करण्यासाठी आलेल्या महिलेला चक्कर आली. उपचारासाठी वाडीलिंबू येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. सुषमा पोपट साळुंखे (वय ५५, मूळ रा. मर्दवाडी वाळवा, सांगली सध्या रा. लांजा) असे मृत महिलेचे नाव आहे.
ही घटना सोमवारी (ता. १२) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
मिळालेल्या पोलिसांकडून माहितीनुसार, सुषमा साळुंखे या मोटार चालक प्रथमेश पाटील याच्यासोबत भाजी विक्री करण्यासाठी आल्या होत्या. १२ जानेवारीला सकाळी आठच्या सुमारास सापुचेतळे येथील बाजारपेठेत जाऊन भाजीविक्रीसाठी त्यांनी दुकान थाटले होते.