गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा
रत्नागिरी, : गावठी हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई ९५० रुपयांची नऊ लिटर दारु जप्त केली. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखाराम गणपत ठोंबरे (वय ६०, रा. दख्खीन गुरववाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १५) दुपारी पावणेबाराच्या सुमारास दख्खीनगावी चिचवाडी येथील रस्त्यालगत आंब्याच्या झाडाखाली निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वृद्ध विनापरवाना ९५० रुपयांची नऊ लिटर दारु विक्रीसाठी बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार शांताराम पंदेरे यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वृद्धा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.