खेडशी येथे कार- दुचाकीचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी
रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथे बुधवार 14 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास भरधाव कारने आपल्या पुढील दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक देत अपघात केला. यात दुचाकीवरील दाम्पत्य गंभिर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शशिकांत गजानन सनगरे (37) व त्यांची पत्नी जान्हवी शशिकांत सनगरे (32,दोन्ही रा.हातखंबा,रत्नागिरी) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. बुधवारी सायंकाळी शशिकांत सनगरे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एएफ-0413) वर पाठीमागे पत्नी जान्हवीला सोबत घेउन खेडशी हातखंबा ते रत्नागिरी असे येत होते. ते खेडशी येथे आले असता पाठीमागून येणाऱ्या भरधाव टाटा पंच (एमएच-08-एएक्स-8276) कारने सनगरे यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भिषण होती कि, दुचाकी वरील दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेल्याने गंभिर जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजुला करुन वाहतुक पूर्ववत केली.
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील खेडशी येथील महालक्ष्मी मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळील वळणावर एक कार आणि दुचाकी यांची जोराची धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, त्यावरील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावून आले.
हा अपघात महामार्गावर झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. कामावरून घरी परतणाऱ्यांची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.