रोडरोलरचालकावर गुन्हा दाखल
साखरपा : लांजा-दाभोळे रस्त्यावर रोडरोलर चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. काशीराम धाकटू सुकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पुतणे यशवंत शांताराम सुकम हे आपली दुचाकी घेऊन दाभोळे खालची गुरववाडी येथे जात होते. बावीचा पऱ्या या ठिकाणी ते आले असता रोडरोलर चालक रियाज मुबारक टिवळे
हा रोडरोलर रस्त्याच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला रिव्हर्स घेत येत होता. रोडरोलरचा वेग जास्त असल्यामुळे चालकाला तो नियंत्रणात ठेवता आला नाही. अशातच त्याची धडक दुचाकी चालवत असलेल्या सुकम यांना बसली. त्यात ते स्वतः जखमी झाले आणि दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. रोडरोलरचालक रियाज टिवळे याच्यावर देवरूख पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले