गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या
संगमेश्वर, ता. ५ : तालुक्यातील तांबेडी येथील एका वृद्धाने राहत्या घराच्या शेजारील शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अशोक सुडुकु सावंत (वय ६५, रा. तांबेडी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.
सावंत हे ३ जानेवारीला सायंकाळी घरून बाहेर पडले होते; ४ जानेवारीला तांबेडी येथील हेदीचे भात नावाच्या शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.