नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोकण नगरचे व कीर्तिनगर चे नवनिर्वाचित नगरसेवकांचा वार्डात कामाचा धडाका.
रत्नागिरी : नगर परिषद वार्ड क्र 4 उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाशे नगरसेवक श्री केतन उमेश शेट्ये तसेच फौजीया तनवीर मुजावर यांनी निवडून येताच प्रभागात नागरिकांना येणारे समस्या सोडवण्याची व त्यांच्यासाठी सामाजिक उपक्रम व सरकारी योजना प्रभागात राबवण्याच्या धडाका सुरू केला आहे. प्रभागात नाळेसफाई, वार्डाची स्वछता, स्ट्रीट लाईट समस्या सोडवण्यास भर दिला जात आहे.त्याच अनुषंगाने दि :- ०५/०१/२०२६ व ०६/०१/२०२६ रोजी भारत सरकार मार्फत राबवली जाणारी आयुष्यमान कार्ड योजनेच्या शिबिराचे वार्डात आयोजन करण्यात आले होते. सदर दोन दिवसांच्या शिबिरामध्ये कोकण नगर, कीर्तिनगर मधील सुमारे २५० नागरिकांचे आयुष्यम कार्ड नव्याने काढण्यात आले. सदर शिबिरास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.व नगरसेवकांचे मनापासून आभार मानले तसेच नागरिकांना माजी नगरसेवक कार्यसम्राट कै. उमेश शेट्ये साहेब यांच्या कार्यप्रणाली चा ठसा नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये दिसला.तसेच ह्या पुढे ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दोन्ही नगरसेवक कटिबद्ध राहतील अशी गव्हाही दिली.व भविष्यात प्रभागात राबवण्यात येणाऱ्या सर्व शासकीय व सामाजिक उपक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
