पोटात दुखू लागलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी ः पोटात दुखू लागलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. राजेश विश्वनाथ यादव (वय ३७, रा. गोडावून स्टॉप साई मंदिरच्या बाजूला, नाचणे, रत्नागिरी. मुळ संतकबीर नगर, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २९) सकाळी पावणे अकराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेश यादव यांच्या मागील तीन दिवस पोटात दुखत होते. रविवारी (ता. २८) पोटात जास्त दुखू लागले सकाळी नऊ वाजता त्यांना उपचारासाठी जनार्दन रामकेस कुमार यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात साडेदहा वाजता दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.