शिर्के हायस्कूल येथे वीर बाल दिवस विविध उपक्रमांनी साजरा ; डायट प्राचार्य कांबळे यांच्याकडून कौतुक
रत्नागिरी (प्रतिनिधी )
शहरातील आर. बी. शिर्के हायस्कूल रत्नागिरी येथे दि.२६ डिसेंबर २०२५ हा दिवस “वीर बाल दिवस” म्हणून विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रत्नागिरी एज्यूकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी लाठी काठी – एक स्व संरक्षण या उपक्रमाचे उदघाटन केले व हा उपक्रम विद्यार्थ्यांना उत्तम भावी नागरिक घडविण्यास मदत करेल असे नमूद केले .सदर कार्यक्रमाचा लाभ प्रशालेतील सुमारे ३५९ विद्यार्थ्यांनी घेतला . रत्नागिरी डायट प्राचार्य गीता कांबळे यांनी उपक्रमाचे कौतुक केले .तसेच जेष्ठ अधिव्याख्याता दिपा सावंत यांनी कार्यक्रमास सदिच्छा दिल्या . असे प्रशिक्षण प्रत्येक शाळेत होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित करण्यात आले यामध्ये दि. २६ रोजी प्रशालेचे स्काऊट शिक्षक प्रशांत जाधव यांनी परिपाठा दरम्यान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार विजेत्यांच्या प्रेरणादायी कथा सादर केल्या तसेच स्वांतंत्र्य पूर्व काळापासून स्काऊट उत्तम पद्धतीने भारतात सुरू असल्याचे नमूद केले व इतिहासातील भारतीयांच्या शौर्य गाथा सादर केल्या . तसेच आपले राष्ट्रपती पुरस्कार विजेते तसेच पंतप्रधान ढाल स्पर्धा विजेते स्काऊट्स आणि गाईडस देखील जगभरात उच्चपदस्थ ठिकाणी कार्यरत असून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वैद्यकीय टिम मध्ये आपल्या प्रशालेची गाईड उच्च पदावर कार्यरत होती तसेच याच वर्षी प्रशालेचा राज्यपाल पुरस्कार पात्र स्काऊट गौरीज माळी तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या क्रिकेट टीम मधून खेळणार आहे . असा हा दुसरा स्काऊट आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे असेही श्री पी.सी. जाधव यांनी नमूद केले.
विविध उपक्रमात निबंध स्पर्धा , कविता लेखन , कराटे प्रशिक्षण , डीजिटल इंडिया मिशन याबरोबरच सायबर क्राईम याविषयी ॲड . प्रशांत जाधव यांनी माहिती दिली.
भविष्यातील भारताचा वेध या विषयावर प्रशालेची विद्यार्थिनी व यावर्षाची आदर्श वीरबाला रुबीना सय्यद हीने आपले मत मांडले. शिक्षक प्रशांत जाधव यांसह स्काऊट संघराज जाधव ,हर्ष पुसाळकर , अथर्व खापरे ,प्रथमेश लवटे यांनी लाठी – काठी व योग प्रात्यक्षिके सादर केली . तसेच काही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले .कार्यक्रम प्रसंगी प्रस्ताविक सौ. धामापूरकर , सुत्रसंचालन सौ. एस के कांबळे व प्रस्ताविक प्रशांत जाधव यांनी तर आभार प्रदर्शन श्री. पी.डी. करगुटकर यांनी केले . शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री .के .डी . कांबळे यांनी मार्गदर्शन केले . सर्व उपक्रमांचे नियोजन उपमुख्याध्यापिका पूनम पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक उदय लिंगायत , विज्ञान शिक्षक समीर पडवेकर , गाईड कॅप्टन सौ.एस .के . कांबळे सौ.टी जे यादव ,स्काऊट मास्टर युवराज महाले यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.