नूतन नगरसेविका श्रीमती नसरिन खडस यांचा स्नेहबंध मंच मार्फत सत्कार समारंभ संपन्न
चिपळूण— स्नेहबंध मंच चिपळूण या संस्थेच्या संचालिका श्रीमती नसरिन खडस या चिपळूण नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत वार्ड क्रमांक 5 मधून विजयी झाल्या बद्दल त्यांचा स्नेहबंध मंच चिपळूण या संस्थे मार्फत सत्कार करण्यात आला
सदर समारंभ संस्थेचे अध्यक्ष सिताराम शिंदेसर यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाला सदर समारंभात श्रीमती नसरिन खडस यानी आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक, सामाजिक कामाचा आढावा घेऊन त्याना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन यथोचित सत्कार केला
सदर कार्यक्रमास स्नेहबंध मंच चे उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णीसर, विनायक घटेसर, प्रकाश सावर्डेकर सचिव विकास ढवण, पांडुरंग लकडेसर, नारायण खेडेकर, मानसिंग यादव ,चंद्रकांत मांडवकरसर, सौ.कुलकर्णीबाई इत्यादि उपस्थित होते
खडस मॅडम यानी आपल्या मनोगतात मी नगरपालिकेत ही तुम्हा सर्वांच्या मार्गदर्शनात उतम काम करीन अशी ग्वाही दिली शेवटी प्रकाश सावर्डेकर यानी आभार मानले व कार्यक्रम संपला