जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी युतीचा हाच पॅटर्न
चिपळूण:- चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाची फसवणूक केली नाही. शिवसेना भाजप युतीने निवडणूकीला सामोरे गेलो आणि एकहाती यश मिळाले. नगराध्यक्षपदी युतीचे उमेश सकपाळ मोठ्या फरकाने विजयी झाले. आता हाच पॅटर्न आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी राबवला जाईल. महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला दरवाजे बंद असल्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणातील युतीच्या मेळाव्यात दिले.
चिपळूण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना भाजप युतीने 16 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली. या पार्श्वभूमीवर युतीच्या नवनिर्वाचीत नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा सत्कार पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी अतिथी सभागृहात करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्यात महायुतीला मोठे य
श मिळाले. राजापूरात थोड्याशा फरकाने जागा गेल्या. परंतू तेथे गतवेळच्या तुलनेत नगरसेवकांची संख्या वाढली आहे. उर्वरीत रत्नागिरी, लांजा, देवरूख, चिपळूण, गुहागर आणि खेड मध्ये युतीला मोठे यश मिळाले. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत युती व्हावी अशी आमचीही इच्छा होती. मात्र ते ठरा
वीक जागांवर अडून बसल्याने महायुती झाली नाही. शिवसेना भाजप युतीला या निवडणूकीत चांगले यश मिळाले. त्यामुळे हाच पॅटर्न आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी राबवला जाईल. जिल्ह्यातील महायुतीबाबत आपण योग्य निर्णय घेऊ. रत्नागिरी पालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिले तरी त्यांना एक
ाही जागेवर विजय मिळवता आला नाही. चिपळूणात पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा जाहीर दिलाच आहे. आता त्यांना महायुतीचे दरवाजे बंद असतील. शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण म्हणाले, चिपळूण पालिकेच्या निवडणूकीत कोणी कोणाला फसवले हे मतदारांनी दाखवून दिले आहे. ज्या जागांवर राष्ट्रवादी अडून बसली, तेथील राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले आहेत. यातून त्यांनी बोध घ्यायला हवा. भाजप नेते यानिवडणुकीत युती म्हणून योग्य नियोजन केल्याने मोठे यश मिळाले आहे. मतदारांनी युतीवर जो विश्वास टाकला तो सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. चिपळूण शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी आपले प्रयत्न असतील.
नवनिर्वाचीत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनीही आपल्या भावना व्यक्त करत शहर विकासाला गती देण्याचे आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते युतीच्या विजयी उमेदवारांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मेळाव्यात चिपळूण पालिकेच्या नविन इमारतीसाठी 1 महिन्यात निधी मंजूर करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी रायगडचे मंत्री भरत गोगावले, माजी आमदार संजय कदम, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शशिकांत चव्हाण, शहरप्रमुख व नगरसेवक शशिकांत मोदी, तालुकाप्रमुख विनोद भूरण, संदेश आयरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.