ट्रॅक्टर अपघातात आंबडवेत एकाचा मृत्यू
मंडणगड, : आंबडवे-मंडणगड मार्गावर जांभळीची मळी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. प्रकाश पांडुरंग गोरे (वय ३५, रा. घोसाळे-धनगरवाडी) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी चालक सुभाष लिंबाजी जाधव (रा. समर्थननगर, भिंगळोली) याच्याविरुद्ध मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रमेश गंगाराम गोरे (वय ३५, रा. घोसाळे-धनगरवाडी) यांनी फिर्याद दिली. २१ डिसेंबरला दुपारी आंबडवे-मंडणगड मार्गावरील जांभळीची मळी येथे हा अपघात घडला. ट्रॅक्टर चालकाने फिर्यादीचे चुलत भाऊ प्रकाश गोरे यांना धडक दिली. धडकेनंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघातात गोरे यांचा मृत्यू झाला.