गुहागरात पिता- पुत्र बनले नगरसेवक
एकाच घरात दोन पक्ष
गुहागर : नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागून राहिलेली लढतीत अखेर पिता- पुत्रांनी विजय मिळवून एकाच घरात दोन नगरसेवक निवडून येण्याच्या विक्रम केला आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेनेकडून राजेंद्र अर्जुन भागडे यांनी यांनी निवडणूक लढवली होती याठिकाणी त्यांनी उबाठाच्या उमेदवाराचा पराभव केला.तर प्रभाग क्रमांक 14 मधून सौरभ राजेंद्र भागडे यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला.या दोन्ही पिता पुत्र यांच्या विजयामुळे आता एकाच घरी 2 पक्ष नांदत असून 2 नगरसेवक एका घरात असणार आहेत.सध्या ही चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत आहे.
गुहागर नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरताना भाजप व सेना यांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचे ठरवले.मात्र महायुतीतील तिसऱ्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी ही निवडणूक स्वतंत्र लढण्याचे ठरवल्याने महायुतीमध्ये विभाजन होऊन केवळ सेना भाजप युती झाली.मात्र यावेळी प्रभाग क्रमांक 13 मधून शिवसेनेकडून राजेंद्र अर्जुन भागडे यांनी निवडणूक लढवली तर प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून सौरभ राजेंद्र भागडे याने निवडणूक लढवली.पिता-पुत्र निवडणुकीत असल्याने आणि मुख्य म्हणजे दोघेही वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्याने आता याचीच चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीत दोघांनी स्वतंत्र निवडणूक लढवली असली तरी देखील महायुतीत हे दोन्ही पक्ष एकत्र असल्याने आता निकालानंतर ते एकत्र सत्तेत येतात का हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.