पावस येथे मद्याच्या नशेत वृद्धाचा आत्महत्या
पावस ः मद्य प्राशन करुन आलेल्या पतीला पत्नीने बडबड करु नका असे सांगितले असता मद्याच्या नशेत खोली बंद करुन वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशोक रामचंद्र वारीशे (वय ६०, रा. सामंतवाडी, पावस, रत्नागिरी) असे आत्महत्या करणाऱ्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १५) रात्री आठ ते साडेनऊच्या सुमारास पावस येथे घडली. पोलिसांकडून मिळालल्या माहितीनुसार अशोक वारीशे यांना मद्य प्राशनाचे व्यसन हेते. ते दारुच्या नशेत बडबड करत असतं त्यांच्या पत्नीने बडबड करु नका असे सांगितले म्हणून अशोक वारिशे याने राहात्या घराची खोलीचे दरवाजे बंद करुन आतून कडी लावून खोलीतील लोखंडी बारला नायलॉनच्या निळ्या रंगाच्या दोरीने स्वतः गळफास लावून घेतला. हे त्यांच्या मयत हे लोंबकळत असल्याचे मुलाने पाहिल्यावर त्यानी खोलीचा दरवाजा तोडून त्यांना खाली उतरविले. उपचारासाठी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. पुर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.