50 वी कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा – 2025, समारोप समारंभ.
रत्नागिरी ः प्रतिनिधी
दापोलि पोलिस ठाणे हद्दीमधील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ येथील क्रीडांगणावर, 50 वी कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 हा भव्य क्रीडा महोत्सव दि.8 ते 13 डिसेंबर असा पार पडला. या स्पर्धे करिता कोकण परिक्षेत्रामधील नवी मुंबई, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय पालघर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार खेळाडू यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेचा समारोप समारंभ दि.13 डिसेंबर रोजी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, संजय दराडे (भा.पो.से.) यांच्या शुभ हस्ते पार पडला. या समारोप समारंभाकरिता पोलीस अधीक्षक,नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व स्पर्धा समित्या व व्यवस्थापन अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.50 वी कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा- 2025 मधील सर्व विजेत्या खेळाडूंना तसेच विजेत्या संघांना विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र, संजय दराडे यांनी शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या शुभ हस्ते मेडल्स, चषक व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
या क्रीडा स्पर्धेमधील जनरल चॅम्पियनशिप (पुरुष व महिला) ही मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय या संघाने प्राप्त केली. तसेच या स्पर्धेतील बेस्ट ॲथलीट पुरुष हे रायगड जिल्ह्याचे लक्ष्मण हाशा दरवडा हे ठरले तर बेस्ट ॲथ्ालीट महिला मध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या शीतल संभाजी पिंजरे या ठरल्या. 50 वी कोंकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा- 2025 मधील जनरल चॅम्पियनशिप (पुरुष व महिला) विजेत्या संघास मा. विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या शुभहस्ते मेडल्स, ट्रॉफी व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेतील बेस्ट ॲथ्ालीट पुरुष लक्ष्मण दरवडा, रायगड जिल्हा यांना एक दुचाकी वाहन, ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच बेस्ट ॲथ्ालीट महिला, शीतल पिंजरे, रत्नागिरी जिल्हा यांना एक दुचाकी वाहन, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक, बी.बी. महामुनी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली तसेच सर्व पोलीस अधिकारी, समित्या आणि व्यवस्थापक यांच्या समन्वयामुळे क्रीडा स्पर्धा ह्या अत्यंत यशस्वीपणे पार पडल्या आहेत.