साखळोलीत अपघात, एक जण जखमी
दापोली : तालुक्यातील साखळी निसर्ग नर्सरीजवळ इको गाडी व होंडा कार यांच्यात अपघात होऊन एक जण जखमी झाल्याची घटना १२ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज संतोष कदम (रा. २७, आपटे मधलेवाडी) हे आपली इको गाडी घेऊन प्रवास करत होते. चालक नितीन दत्ताराम रांगोळी हे ही गाडी घेऊन आपटीवरून गावतळेकडे जात होते. त्याचवेळी निसर्ग नर्सरीजवळ आले असता समोरून येणाऱ्या होंडा कारने (एमएच ४३ बीएन २६७७) भरधाव वेगात येऊन इको गाडीला धडक दिली. यामध्ये इको गाडीतील सुरज कदम हे जखमी झाले. होंडा कार आर्यन गणेश निकम (२१, रा. जुईनगर, नवी मुंबई) हे चालवत होते. अपघातात जखमींना प्राथमिक उपचारासाठी त्यांना हलविण्यात आले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाणे बीएनएस कायदा कलम २८१,१२५ नुसार व मोटार वाहन कायदा १९८८ कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बुरोंडकर करीत आहेत.